Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

गोविंदा रे गोपालाच्या गजरात शाळेत फुलले नंदनवन!

शिक्षण विश्व: मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र उत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शाळा जणू गोकुळधामच भासत होती. गोविंदा रे गोपालाच्या गजरात शाळेचे जणू नंदनवन झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजनाने झाली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला होता.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक श्रीकृष्ण व राधा यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या वेशभूषेने आणि सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः लहान विद्यार्थ्यांचे रूप पाहून शाळा ‘बालगोपाळांनी’ गजबजून गेली होती.

कार्यक्रमात विविध नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून ज्युनिअर कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध भक्तिगीतांवर नृत्य सादर केले. त्यांच्या कलाकौशल्यामुळे शाळेच्या सभागृहात जणू एक नंदनवन फुलले होते.

हेही वाचा       :      श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शन यात्रेस महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

यासोबतच सर्वात आकर्षणाचे केंद्र ठरली ती म्हणजे पारंपरिक दहीहंडी स्पर्धा विद्यार्थ्यांच्या संघांनी मटकी फोडण्यासाठी कौशल्य, एकजूट आणि धैर्य दाखवले. मटकी फोडल्यावर टाळ्यांचा कडकडाट आणि ‘गोविंदा आला रे’ च्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.

प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर यांनी आपल्या भाषणात श्रीकृष्णाच्या जीवनातील धर्म, प्रेम, ज्ञान आणि कर्म यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, “असे उत्सव केवळ सण साजरे करण्यापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे शिक्षण देण्याचे उत्तम माध्यम आहेत.”

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेतील शिक्षक व सांस्कृतिक समिती यांच्या पुढाकाराने झाले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा प्रतिसाद यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button