Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

PMRDA | पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएची कारवाई!

कारवाईबाबत व‍िशेष मोह‍िमेची आखणी : अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंगळवारी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रोडवरील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर निष्कासन कारवाई करण्यात आली. पालखी मार्गासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी लावलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्राधिकरण हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात येणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

पुणे शहरात संताच्या पालख्यांचे आगमन २० जून २०२५ रोजी होणार आहे. पुणे – सासवड रोड मार्गे संत ज्ञानेश्वर माऊलींची तसेच पुणे – सोलापूर रोड मार्गे संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होईल. या दोन्ही रस्त्यांवरील २१ होर्डिंग काढण्यात आले असून यापुढेही अनधिकृत होल्डिंगवर निष्कासनाची कारवाई सुरु राहणार आहे. या दोन्ही पालखी मार्गावरील सर्व अनधिकृत होर्डिंग पुढील १० दिवसात काढण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाने नियोजन केले आहे.

हेही वाचा   :    महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित 

अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंगपासून संबंधित भागातील नागरिकांसह प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांच्या हिताचा विचार करून अशा होर्डिंगवर पीएमआरडीएच्या माध्यमातून दररोज कारवाई सुरू आहे. जाहिरातदार व जागामालकांनी वर्दळीसह रहदारीच्या ठिकाणावरील धोकादायक, मर्यादेपेक्षा अधिक उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासह होर्डिंगधारकांनी आपल्या अनधिकृत होर्डिंगला परवानगी घ्यावी, अन्यथा ते एकतर्फी काढण्यात येतील. पीएमआरडीएच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन होर्डिंग उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन सह आयुक्त संजय गायकवाड यांनी केले आहे.

सदर कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, प्रभारी महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. कारवाईवेळी प्राधिकरणाचे तहसीलदार रविंद्र रांजणे, पोलीस निरिक्षक महेशकुमार सरतापे, शाखा अभियंता हरीश माने, तेजस मदने, शरद खोमणे, दिपक माने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button