Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC NEW DP | एचसीएमटीआर प्रकल्पाविरोधात हरकतींची बरसात!

शहर विकास आराखड्यावर नोंदविल्या साडेतीनशे हरकती

सार्वजनिक सेवा व सुविधांसाठी आरक्षणे, नवीन प्रकल्प प्रस्तावित

प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे पाहण्यासाठी खुले

पिंपरी चिंचवड | शहराचा नवीन सुधारित प्रारूप विकास आराखडा १४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचे नकाशे १६ मेपासून नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. आराखड्यावर आतापर्यंत ३५० हरकती महापालिकेकडे आल्या. चिखली एचसीएमटीआर (रिंग रोड) प्रकल्पांविरोधात सर्वाधिक हरकती आहेत.

महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग केलेल्या एकत्रित प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. नकाशा महापालिका भवनातील सभागृहात खराळवाडी, नियोजन प्राधिकरण कार्यालयात उपलब्ध आहे.

हेही वाचा   :    PMRDA | पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएची कारवाई! 

महापालिकेने विकास आराखडा तयार करताना एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. आराखड्यात शहरातील विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्याबाबत नागरिकांकडून १६ मेपासून ६० दिवसांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. संकेतस्थळावरही नकाशा पाहता येतो. विकास आराखड्यामध्ये पुररेषेमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे तर दुसरीकडे बासनात गुंडाळलेला रिंगरोड प्रकल्प पुनर्जीवित करण्यात आल्याने नाराजी वाढत आहे.

आरक्षणाबाबत विरोधाभास

शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात विविध आरक्षणे टाकण्यात आली आहेत. काही ठिकाणचे आरक्षण परस्पर रद्द करण्यात आले आहे. बांधकाम परवानगी घेऊनही त्या ठिकाणी आरक्षण टाकल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्या आरक्षणांना आक्षेप घेत आतापर्यंत एकूण ३५० हरकती महापालिकेकडे आल्या आहेत. त्यात सर्वाधिक हरकती चिखली, एचसीएमटीआर (रिंग रोड) व इतर भागांतील आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button