Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पूर नियंत्रण नियोजन वर्षभर आधीच करा; मनपा आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना

पुणे :  शहरात पूर बाधित होणाऱ्या २९ ठिकाणांच्या नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरणासाठी आतापासून जागांची निश्चिती करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत शहरात अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात टेकड्यांच्या भागात वारंवार पूरस्थिती उद्भवते आहे. त्यातच नदीची वहनक्षमता घटल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठ परिसरातही पूरस्थिती निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ही बैठक घेण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, समितीचे सदस्य, जलसंपदा विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा –  महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला फोन

शहरात यंदा मोठी पूरस्थिती उद्भवली. तसेच विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, विठ्ठलवाडी, निंबजनगर परिसर पाण्याखाली गेला. त्यात सुमारे साडेचारशे कुटुंबे बाधित झाली. त्यानंतर या पुराची कारणे शोधण्यासाठी महापालिका आयुक्तांनी विशेष समिती नेमली होती. या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी नुकतीच बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीत आयुक्तांनी याबाबत सूचना केल्या आहेत. या शिवाय, शहरात शहरात अनेक भागांत पर्जन्यमापक बसवावे, त्याची नोंद आपत्कालीन परिस्थिती विभागाकडे करावी, अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button