महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी कोणा कोणाला फोन

मुंबई : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः आमदारांना फोन करुन मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगत आहे.
भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह 12 मंत्रिपदे मिळणार आहे. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदासाठी आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी फोन केले आणि मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला, पाहा संपूर्ण यादी…
भाजपकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर,
संजय सावकारे
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपची मोर्चेबांधणी! 12 जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर हा शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर याची जोरदार तयारी करण्यात आलीय. याआधी 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता .यानंतर 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात होणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज पहिल्यांदा नागपूर मध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे.





