Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमध्‍ये पोलिसांसाठी ‘पोलीस रुग्‍णालय’ सुरु

पिंपरी : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वाकडमध्‍ये पोलीस रुग्‍णालय सुरू केले आहे. या रुग्‍णालयाचे उद्‌घाटन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. कामच्‍या व्‍यापात पोलिसांचे आरोग्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍याने सुसज्ज पोलीस रुग्‍णालय सुरू करण्यात आले आहे.

पोलीस म्हटले की, ताण तणाव हा नक्कीच असतो. भारत हा असा देश आहे ज्या ठिकाणी सण-उत्सव सर्वात जास्त साजरे केले जातात आणि याच सण-उत्सवात सुरक्षेची जबाबदारी आणि काही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून पोलीस हे तत्पर राहतात. यामुळेच ते अनेकदा त्यांच्या कुटुंबासमवेत सण आणि उत्सव देखील साजरे करत नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते २४ तास कार्यरत असतात. कामाचा ताण आणि शारीरिक, मानसिक थकवा आल्याने स्वतःकडे देखील लक्ष देण्याची वेळ पोलिसांकडे बहुतांशवेळी नसतो. अनेकदा त्‍यांच्‍या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्‍यामुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाकड परिसरातील कावेरी नगर येथे पोलीस रुग्‍णालय कार्यान्वित केले आहे.

हेही वाचा –  स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपची मोर्चेबांधणी! 12 जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन

या रुग्‍णालयासाठी डॉ. राधाकृष्ण पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. वैद्यकीय अधिकारी अनुपमा कांबळे, डॉ. संजय भारती यांच्यासह आठ जणांचा स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण ४,९२७ महिला आणि पुरुष अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्‍यावर आहेत. त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पोलीस रुग्‍णालय सुरू करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी विनयकुमार चौबे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button