TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

येरवड्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

पीटर रतन पंडित (वय ६५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित यांची पत्नी नंदा (वय ६५) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंडित हे रात्री साडेदहाच्या सुमारास येरवड्यातील शांतीरक्षक सोसायटी परिसरातून जात होते. त्या वेळी भरधाव वाहनाने पंडित यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button