Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

उद्धव ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार

प्रादेशिक पानावरील अँकर न्यूज

उद्धव ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार

मातोश्रीवर ठरलं सॉलिड प्लानिंग; उद्धव ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

मुंबई । न्यूज एक्स्प्रेस मराठी ।

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नवा गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे.

तसेच ही याचिका आजच तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button