यंदाचा “मराठी राजभाषा दिन” विशेष
मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी यासाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसाला राज्यभरात विशेष महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? महाराष्ट्रात आणि बाहेरही राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही देण्यात आला. त्यामुळे तर यंदाचा “मराठी राजभाषा दिन” विशेष आहे. हीच मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी आणि मराठीचा आदर व्हावा, यासाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
पण आजचाच दिवस मराठी बाषा दिन म्हणून का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का ?
खरंतर , आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध कवी, लेखक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती असते. त्या निमित्ताने मराष्ट्रामध्ये आणि बाहेरही मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने 21 जानेवारी इ.स. 2013 रोजी घेतला होता. तेव्हापासूनच सर्व मराठी भाषिक आजचा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात.
आजच्या या दिवशी मराठीतील खास, प्रसिद्ध , लोकप्रिय, अशा काही कवितासंग्रहांबद्दल जाणून घेऊया. यातील अनेक कवितासंग्रह तुम्हीही वाचले असतील. खाली नमूद केलेल्या कवितासंग्रहांपैकी कोणते तुम्ही वाचलते, हे नक्की सांगा.
हेही वाचा – अमेरिकेची संशोधनासाठी पुण्याला पसंती! विविध संस्थांसोबत भागीदारीचे पाऊल
मराठीतील प्रसिद्ध कवितासंग्रह…
1) कुसुमाग्रज – ‘विशाखा’, ‘समिधा’, ‘किनारा’
2) नामदेव ढसाळ – ‘गोलपिठा’, ‘तुही यत्ता कंची’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘गांडू बगीचा’, ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’
3) नारायण सुर्वे – ‘माझे विद्यापीठ’, ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘सनद’, ‘जाहीरनामा’
4) ना. धों. महानोर – ‘अजिंठा’, रानातल्या कविता’
5) सुरेश भट – ‘एल्गार’, ‘काफला’, ‘रूपगंधा’, ‘झंझावात’
6) इंदिरा संत – ‘गर्भरेशीम’, ‘बाहुल्या’,
7) शांता ज. शेळके – ‘वर्षा’, ‘रूपसी’, ‘तोच चंद्रमा’,
8) ग्रेस – ‘बाई! जोगिया पुरुष’,‘राजपुत्र आणि डार्लिंग’,‘संध्याकाळच्या कविता’
9) मंगेश पाडगावकर – ‘सलाम’, ‘उदासबोध’
10) बहिणाबाई चौधरी – ‘बहिणाबाईंच्या कविता’
11) आरती प्रभू – ‘नक्षत्रांचे देणे’, ‘दिवेलागण’
12) विठ्ठल वाघ – ‘काया मातीत मातीत’, ‘गावशीव’, ‘पाऊसपाणी’