ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एलपीजी गॅसच्या नवीन किमती १ जुलै २०२५ पासून जाहीर

१९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट

महाराष्ट्र : सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी आणि रेल्वेच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष गॅस सिलेंडरच्या किमतींकडे लागले होते. आज १ जुलै २०२५ रोजी सकाळी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. दिल्लीपासून वाराणसीपर्यंत हा सिलेंडर ६० रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना फायदा होईल. मात्र, घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

हेही वाचा     :    Bengaluru Stampede | ११ चाहत्यांच्या मृत्यूला RCB जबाबदार, CAT चा मोठा निर्णय

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात
देशातील विविध शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५७ ते ६० रुपयांपर्यंत कपात झाली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १७२३.५० रुपयांना होता, पण आता हा सिलेंडर १६६५ रुपयांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये १८२६ रुपयांना विक्री होणारा सिलेंडर १७६९ रुपयांना मिळणार आहे. तसेच मुंबईत हा सिलेंडर आता १६१६ रुपयांना मिळेल. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत १८२३.५० रुपये इतकी झाली आहे.

दरम्यान सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीसह मुंबई, कोलकाता या शहरात घरगुती सिलेंडरची किंमत साधारण ८०० ते ९०० रुपये आहे. हा सिलेंडर सरकारी अनुदानाच्या (सबसिडी) कक्षेत येतो, ज्यामुळे लोकांना आधीच काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

शहर घरगुती सिलेंडरची किंमत (₹)
दिल्ली 853.00
पाटणा 942.50
लखनऊ 890.50
मुंबई 852.50
हैदराबाद 905.00
गाजियाबाद 850.50
वाराणसी 916.50

उज्ज्वला योजनेअंतर्गत लोकांना मोठा आधार
सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत १० कोटी लाभार्थ्यांना सिलेंडरवर ३०० रुपयांची थेट सबसिडी दिली जाते. यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे दुर्बळ घटकातील लोकांना मोठा आधार मिळतो. थोडक्यात, व्यावसायिक गॅस वापरणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे, तर घरगुती ग्राहकांना मात्र वाढत्या महागाईतून फारसा दिलासा मिळालेला नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button