“एआय’विषयक क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

पुणे : डिजिटल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आज झपाट्याने बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात अनेक आव्हाने असली, तरीही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कुठल्याही विषयात पदवी संपादन करत असाल, तरी एआयविषयक छोटे छोटे अभ्यासक्रम पूर्ण करा, असा कानमंत्र संणगकतज्ज्ञ डाॅ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडियातर्फे आयोजित एआयएसएसएमएस पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मराठी विज्ञान परिषद वतीने शाश्वत विकास आणि अभियांत्रिकांचे योगदान व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी धवल जीतकर, मराठी विद्यान परिषद पुणेचे अध्यक्ष आर. व्ही. सराफ, प्रा. ए. एन. गेडाम, डॉ. उत्तम आवारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा – दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम; ३० जूनपर्यंत अंमलबजावणी
डॉ. शिकारपूर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करणे आवश्यक आहे. आता नोकऱ्यांची उपलब्धता घटत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उद्योजक होऊन रोजगार निर्मिती करा व देशाचा विकास करा.