ताज्या घडामोडीपुणे
कोरटकर याला आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली

कोल्हापूर : प्रशांत कोरटकर याची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोल्हापूर न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यावर कोरटकर याला आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली आहे.
हेही वाचा – ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटींची तरतूद’; उपमुख्यमंत्री अजित पवार
यानंतर कोरटकर याला कोर्टातून पोलीस कोठडीत नेत असताना कोर्टातील वकिलांकडून कोरटकर याला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली आहे. यावेळी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.