‘केआयटी’च्या प्राध्यापिका डॉ. दिपाली जाधव यांना पीएच.डी. जाहीर
मेंदूच्या ट्युमरबाबत शोध निबंध : अचूक निदानासाठी होणार उपयुक्त

पुणे : कोल्हापूर येथील केआयटी (K.I.T.) महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापिका डॉ. दिपाली किशोर जाधव यांना डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर झाली आहे.
डॉ. जाधव यांनी “Detection of Brain Tumor and Classification using Stack Entropy Based CNN and Predicting Recurrence using Score Based SVM” या विषयावर सखोल संशोधन केले असून, मशीन लर्निंग या आधुनिक आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांनी आपले पीएच.डी. संशोधन पूर्ण केले आहे. या अभ्यासामुळे वैद्यकीय क्षेत्रात मेंदूच्या ट्युमरचे अचूक निदान आणि पुनरावृत्तीची शक्यता ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग होऊ शकतो.
हेही वाचा – मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय, रेल्वेच्या 6,405 कोटींच्या योजनांना मंजूरी
या संशोधनप्रकल्पासाठी डॉ. संग्राम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापण, डीन डॉ. मुरली भूपती, आणि रजिस्ट्रार डॉ. जे. ए. खोत यांचे देखील त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
डॉ. जाधव यांच्या यशामध्ये केआयटी संस्थेचे विश्वस्त साजिद हुदली, सचिन मेनन, दीपक चौगुले, तसेच संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांचे विशेष सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. डॉ. दिपाली जाधव यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील संशोधन व अध्यापन क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पीएच.डी. हा केवळ एक शैक्षणिक पदवीचा टप्पा नाही, तर ही माझ्या कठोर परिश्रमांची, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या पाठबळाची पावती आहे. ‘मशीन लर्निंग’सारख्या गतिमान क्षेत्रात संशोधन करताना सतत नवीन शिकायला मिळाले. मी विशेषतः माझे मार्गदर्शक आणि संस्थेचे विश्वस्त यांची मन:पूर्वक आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हा शोधनिबंध साकार झाला. ही शैक्षणिक वाटचाल माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे आणि भविष्यात विद्यार्थ्यांसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची उर्मी यातून मिळाली आहे.”
– डॉ. दिपाली जाधव, प्राध्यापक, केआयटी.