Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जायका प्रकल्प पुढील वर्षीपर्यंत मार्गी

पुणे : शहरातील सांडपाणी आणि मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी महापालिकेने जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सीच्या (जायका) सहकार्याने प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी देण्यात तीन वर्षांची मुदतवाढ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी वर्षमुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

शहरात दररोज १७५० एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील १४०० एमएलडी मैलामिश्रित पाणी निर्माण होते. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी ९ मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधले आहेत. या एसटीपी प्रकल्पामध्ये दररोज ३६७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे पाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते. तर उर्वरित मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळते. केंद्र सरकारच्या माध्यमातून जायका आर्थिक सहकार्यातून आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत मुळा- मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प राबविला जात आहे. राज्य सरकारडून महापालिकेला या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत नद्यांमध्ये सोडल्या जाणार्‍या मैला पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) उभारणीचा प्रकल्प राबवला जात आहे. त्यात महापालिकेकडून वडगाव, वारजे, मुंढवा, हडपसर (मत्स्यबीज केंद्र), खराडी, भैरोबानाला, नायडू रुग्णालय, धानोरी, बाणेर, नरवीर तानाजीवाडी या दहा एसटीपी केंद्रांची कामे सुरू आहेत, तर बॉटनिकल गार्डन येथील एसटीपी केंद्रासाठीची जागा अद्यापही महापालिकेस मिळालेली नाही.

हेही वाचा –  स्वारगेट प्रकरण : आगारातील अधिकाऱ्यांचे निलंबन; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

११ ठिकाणी एसटीपी प्रकल्प, ५५ किलो मीटर मैलापाणी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या प्रकल्पाचे आत्तापर्यंत ७० ते ८० टक्केच काम झाले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२५ पर्यंत आहे. ही मुदत संपण्यास जेमतेम तेरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, या सर्व प्रकल्पांचे सुमारे ७० ते ८० टक्के कामच पूर्ण झाले असून, आता उर्वरित कामात सर्व यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या कामाला आणखी आणकी एक वर्षाची म्हणजे मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

११ ठिकाणी एसटीपी प्रकल्प

महापालिकेने शहरातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी जायका कंपनीने केंद्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेला ८५० कोटीचे अनुदान दिले आहे. प्रकल्पांतर्गत आंबील ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला, कोथरूड, वारजे आणि हडपसर नाला या शहरातील प्रमुख सहा ओढे व नाल्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विठ्ठलवाडी, नायडू (जुना), नायडू (नवीन), भैरोबा नाला, मुंढवा, खराडी, तानाजीवाडी, बोपोडी, बाणेर, कोथरूड आणि कृषी महाविद्यालयातील बाॅटनिकल गार्डन या ११ ठिकाणी एसटीपी प्रकल्प, ५५ किलोमीटर मैलापाणी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत १० एसटीपी प्रकल्पांची कामे सुरू असून बाॅटनिकल गार्डन येथील काम अद्याप सुरू झालेले नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button