IPS अधिकाऱ्याला निवृत्तीनंतर किती वेतन मिळते ?
युपीएससीची परीक्षा पास झाल्यानंतर एकूण 24 सिव्हील सर्व्हीसेसमध्ये उमेदवारांची निवड केली जाते.

पुणे : युपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विविध सेवांसाठी निवड केली जाते. युपीएससी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विविध सेवांसाठी निवड केली जाते. युपीएससीची परीक्षा पास झाल्यानंतर एकूण 24 सिव्हील सर्व्हीसेसमध्ये उमेदवारांची निवड केली जाते. या सर्व्हीसेस दोन कॅटगरीतल्या असतात. पहीली आहे ऑल इंडीया सर्व्हीसेस. यात सेवेत IAS ( इंडीयन अॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हीसेस ) आणि IPS ( इंडीयन पोलीस सर्व्हीसेस ) या सेवा असतात. यात ज्यांची निवड होते त्यांना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे कॅडर दिले जाते. नंतर दुसऱ्या क्रमांकावर सेंट्रल सर्व्हीसेस, यात ग्रुप ए आणि ग्रुप बी सेवांचा समावेश होतो.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
UPSC क्रॅक केल्यानंतर IAS, IPS आणि IFS,IRTS, IRPS अशा विविध सेवांत गुणांनुसार नियुक्ती होते.
आयपीएस अधिकाऱ्यांचा पे स्केल लेव्हल १० पासून सुरु होतो. सेवाज्येष्ठता आणि प्रमोशन नुसार त्यांचे वेतन ५६,१०० ते २,२५,००० च्या घरात असते
आयपीएस अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर शेवटचा पगार मिळतो त्याच्या ५० टक्के भाग पेन्शन म्हणून दिला जातो.
IPS अधिकाऱ्यांना निवृत्तीवेळी जे शेवटचे वेतन मिळते.त्या वेतनाच्या बेसिकचे ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.
या बेसिक वेतनाच्या पन्नास टक्के पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जोडला जातो
जर आयपीएस अधिकाऱ्यांचा निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या वेतनाचा बेसिक पे एक लाख आहे तर पेन्शन सुमारे ५० हजार मिळणार
१ लाख बेसिक सॅलरीच्या हिशेबाने ५० हजार पेन्शन मिळेल त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ५३ टक्के महागाई भत्ता जोडला जातो.