होळीनंतर ‘या’ ३ राशींवर अशुभ प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू- केतू आणि शनीच्या संक्रमणाचा मोठा परिणाम

पुणे : होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा सण साजरा करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. भारतात होळी या सणाला प्रचंड महत्त्व आहे. तसेच ज्योतिषशास्त्रातही या सणाला तितकेच महत्त्व आहे. पंचांगानुसार, होळी हा सण यावर्षी १४ मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानंतर तीन ग्रहांचे भ्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीनंतर राहू, केतू आणि शनीच्या चालीमध्ये नेमके काय बदणार होणार? त्यामुळे कोणत्या राशींचे नुकसान होणार चला जाणून घेऊया…
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू- केतू आणि शनीच्या संक्रमणाचा मोठा परिणाम हा वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. या राशीच्या लोकांवर हा अशुभ प्रभाव असणार आहे. त्यांच्या प्रेममय जीवनात मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. या राशीच्या लोकांचे मूड हे थोडे वाईट असणार आहेत. वृषभ राशीच्या तरुणांमध्ये मानसिक तणाव वाढणार आहे. तसेच करिअर बाबत चिंता निर्माण होईले. ज्या लोकांचे वय हे ६० ते ८० वर्षे आहे त्यांना पोटदुखीचे आजार सुरु होतील.
धनु
धनु राशीच्या लोकांना देखील होळीनंतर राहू, केतू आणि शनीच्या चालीतील बदलामुळे समस्या निर्माण होणार आहेत. या राशीचे लोक जर करिअरमध्ये प्रगती करण्याची इच्छा बाळगून असतील तर ती पूर्ण होणार नाही. त्यांचे मन अस्वस्थ राहील. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अचानक कर्ज घेण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. जर तुम्ही गेल्या वर्षी एखाद्या मोठ्या कंपनीत गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता नाही.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ आणि धनू या दोन राशींना त्रास होणारच आहे त्यासोबतच कुंभ राशीच्या लोकांवर देखील राहू, केतू आणि शनीच्या संक्रमणाचा वाईट प्रभाव पडणार आहे. त्यांच्या जीवनात नकारात्मकता निर्माण होणार आहे. तसेच प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे कारण गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. वाहने चालवताना काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या लोकांचे सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कार्यकयीन कामकाजावरही होणार. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.