तुमच्या घरात येईल सुख-समृद्धी करा 6 उपाय
गरिबांना जेवण द्या, मोठ्याचे आशीर्वाद घ्या, घरात सुंगधित ठेऊन दिवा लावा.

पुणे : प्रत्येकालाच असे वाटते की त्यांच्या घरात आनंद आणि शांती असावी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पण सध्याच्या काळात, अशी फार कमी घरे आहेत जिथे कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही. जर तुमच्या घरात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर त्रास होत असेल, घरात अशांततेचे वातावरण निर्माण होत असेल, घरातील लोकं अजिबात आनंदी नसतील, तर आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रानूसार अशा काही टिप्स आणि उपाय सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकता. यासाठी हे उपाय करा.
देवाचे ध्यान करा
सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही देवघरात जाऊन बसले पाहिजे असे कोठेही नाही. तुमच्या मनात देवाबद्दल असलेली श्रद्धा फार महत्वाची आहे. यासाठी देवाचे ध्यान करा, त्याने तुम्हाला दिलेल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना आणि तुमचा दिवस शुभ जावो अशी प्रार्थना करा. हे दररोज नियमितपणे करा आणि मग पहा, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता बाळगू शकाल, तेव्हा तुम्हाला सर्वत्र सकारात्मकता दिसेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.
या मंत्राचा जप करा
शास्त्रांमध्ये कोणत्याही दैनंदिन दिनचर्येपूर्वी ‘कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती. करमूले तू ब्रह्माए प्रभाते कर दर्शनम्.’ या मंत्राचा जप करा. म्हणजेच सकाळी उठताच या मंत्राचा जप करा आणि दिवसभराच्या चिंतांपासून मुक्त व्हा. या मंत्राचा जप करताना तुमच्या तळहातांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीकडे पाहू नका. सकाळी उठताच एकदा या मंत्राचा जप करणे म्हणजे स्वतःसाठी आनंदाची प्रार्थना करण्यासारखे आहे.
गरिबांना अन्न दान करा
प्रत्येकांच्या घरात दररोज जेवण बनवले जाते. तर अशावेळी जेवणातून थोडेसे अन्न अशा व्यक्तीसाठी काढून ठेवा जे खूप भूकेले आहेत. किंवा ज्यांना तुम्हीला इतर गोष्टींची मदत करण्याची इच्छा आहे. पण ते करू शकत नसल्यास तुम्ही त्यांना दररोज अन्न दान करून मदत करू शकता. असे केल्याने तुमच्या मनाला मिळणारी शांती इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठी नसेल.
वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद
रोज सकाळी उठून त्यांचे आशीर्वाद घ्या. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने घरात आनंद वातावरण राहते. तसेच तुम्ही वाईट संकटांपासून सुद्धा सुरक्षित राहता. आपल्या हिंदू धर्मात वडीलधाऱ्यांना देवाचा दर्जा दिला आहे. जर तुम्ही तुमच्या पालकांची खऱ्या मनाने सेवा केली तर तुम्हाला देवाची पूजा करण्याचीही गरज नाही. त्यांच्याकडून तुम्हाला जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद मिळतो.
घरातील वातावरण सुगंधित ठेवा
तुमच्या घरात नेहमी सुगंधी वातावरण असणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही घरात सुगंधीत अगरबत्ती लावा किंवा बाजारात मिळणारे लिक्विड फिलर्स तसेच रूम फ्रेशनर्स इत्यादी गोष्टी घरातील हवा ताजी ठेवतात. सुगंधित हवा तुमच्या मेंदूत आनंदाचे हार्मोन्स तयार होतात. जेव्हा तुम्ही कामावरून घरी येता तेव्हा तुम्हाला सुगंधित वातावरणामुळे ताजेतवाने वाटते.
देवघरात दिवा लावा
तुमच्या देवघरात नियमित दिवा लावावा. यालाच देवघर जागृत ठेवणे म्हणतात. तुम्ही देवाला वेळ द्या किंवा नका देऊ, पण जर तुमच्या देवघरात देवांचे स्थान असेल तर त्याच्यासमोर दिवा लावा, जर दिवसातून एकदा नाही तर किमान सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा.