राजगुरूनगरमध्ये ‘हिट अँड रन’, बेधुंद कार चालकाची तीन दुचाकींना धडक

पुणे | राजगुरूनगर परिसरात मंगळवारी (दि ११) रात्री साडे आठ वाजता हिट अँड रन प्रकरण घडले आहे. बेधुंद अवस्थेतील कार चालकाने वेगवेगळ्या ठिकाणी तीन दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला पायी जाणाऱ्या तीन बांधकाम मजुरांना धडक दिली. यानंतर कार ओढ्याच्या कडेला असलेला झाडाला जाऊन धडकली. कार चालक सुखरूप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा रस्त्यावर चासच्या बाजूने कार चालक वेगात येत होता. खांडगे लॉन कार्यालय समोर त्याने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघेजण खाली पडून जखमी झाले. त्यानंतर सातकरस्थळ ग्रामपंचायत इमारती समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीला धडक दिली.
हेही वाचा : मानव सेवा हीच ईश्वर सेवा भावनेतून रुग्णसेवा व्हावी; फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया
इथे दुचाकीस्वार वाचला पण दुचाकीचे पुर्ण नुकसान झाले. तिसऱ्या ठिकाणी म्हणजे प्ले टोर इमारती समोर पायी जाणाऱ्या तीन बांधकाम मजुरांना धडक देऊन पुढे लगेचच दुचाकीला जोराची धडक दिली. या सलग दोन धडकेने कार ओढ्यात जाऊन पडली. पहिल्या तिघांमधील एकाच्या पायाचा चेंदामेंदा झाला. तर पुढील अपघातात आणखी दोन जणांना गंभीर दुखापती झाल्या. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी राजगुरूनगर येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रूग्णासयात दाखल करण्यात आले आहे.