मानव सेवा हीच ईश्वर सेवा भावनेतून रुग्णसेवा व्हावी; फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया
शहरात प्रथमच एसडीएम डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पेट (पीईटी) स्कॅन मशीन अत्याधुनिक सुविधा

पिंपरी-चिंचवड | जैन समाज बांधव परंपरागत विविध क्षेत्रात व्यवसाय करतात. त्याचबरोबर परोपकारक देखील करतात ही परंपरा आहे. व्यवसायातुन नुसता नफा मिळविणे हे अपेक्षीत नसुन सेवा, मदत करने प्रत्येकाचे कर्तव्यच असुन त्याचे संतुलन ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. मूल्यावर आधारित आपले जीवन जगायचे असेल तर, मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून याचा ध्यास प्रत्येकानी अंगीकारून व्यवसायाबरोबरच मानवी सेवा प्रामाणिकपणे कर्तव्य या जाणिवेतून करावी. मात्र, परोपकार करताना आपला धर्म बाजूला ठेवावा, असे आवाहन फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी केले.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कर्करोग, ट्युमर, हाडांचे गंभीर आजारापासून शहरवासीयांना वेळीच त्वरित निदान व्हावे, तज्ञ डॉक्टराकरवी उपचार मिळावे, यासाठी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. शैलेश शर्मा, डॉ. दीपक शहा, डॉ. महेश बोरा, डॉ. केविन बोरा या संचालकांनी एकत्र येत सामूहिकरीत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आणि माफक दरात पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच एसडीएम डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पेट ( पीईटी ) स्कॅन मशीन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचे उद्घाटन फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी आशीर्वाद देण्यासाठी जेपी गुरुदेव महाराज याच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील नाईक हॉस्पिटलचे संचालक डॉ. सत्यशील नाईक, फलटण येथील लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल भोजराज नाईक-निंबाळकर ,डॉ सचिन गांधी, डॉ संजय कुलकर्णी, पुनीत बालन समवेत त्यांची पत्नी जानव्ही बालन, शोभा धारीवाल, ओम प्रकाश रांका, राजेश शहा, दीपक बोरा, डॉ शैलेश गुजर, राजकुमार चोरडिया, प्रकाश धोका, कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, एसडीएम डायग्नोस्टिकचे संचालक डॉ शैलेश शर्मा, डॉ दीपक शहा, डॉ महेश बोरा, डॉ केविन बोरा, तेजस शर्मा समवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . यावेळी उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांचा शालपुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : विद्यार्थ्यांनी जाणून घेतले नवीन फौजदारी कायदे
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन संचालक डॉ दीपक शहा यांनी केले. डॉ महेश बोरा यांनी आभार मानले.
मानवता शिवाय मानवी धर्म असफल…
जेपी गुरुदेव महाराज आशीर्वाद देताना आपल्या प्रवचनात म्हणाले, मानवता शिवाय मानवी धर्म असफल असते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णासाठी सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी ,येथे जास्त दिवस राहन्यासाठी कुठल्याही रुग्णाला आवडत नाही. डॉक्टरांकडून उपचार करून लवकरात लवकर बरा होऊन हसतमुख स्वस्थ होऊन आपल्या घरी जावावा हीच अपेक्षा व्यक्त केली . माझ्या मते हीच ईश्वरी सेवा आहे .
स्कॅन मशीन हे अत्याधुनिक महागडे मशीन…
प्रमुख पाहुणे डॉ सत्यशील नाईक म्हणाले पेट ( पीईटी ) स्कॅन मशीन हे अत्याधुनिक महागडे मशीन आहे. ज्याच्यामुळे रुग्णाला कर्करोग, ट्युमर, हाडांचे आजार आदीचे अचूक निदान लवकरात लवकर होते. कर्करोग शरीरात किती प्रमाणात पसरला आहे हे डॉक्टरांना तात्काळ समजते. त्यामुळे रुग्णावर उपचार करून या रुग्णांना दिलासा , जीवदान मिळू शकेल . रूग्णाच्या तक्रारी असल्या तरी रुग्णाचे खुब्यांचे फ्रॅक्चर एक्स-रे मशीन द्वारे दिसून येत नाही. परंतु पेट ( पीईटी ) स्कॅन मशीनद्वारे तपासणी केली तर तात्काळ फ्रॅक्चर दिसून येतो. नागरीकाना आवाहन करताना म्हणाले , प्रत्येकाने आरोग्य विमा काढावा, कारण प्रसंगी रुग्ण व कुटुंबीयांना आर्थिक समस्याना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. राज्य सरकारने ग्रामीण भागातही पेट ( पीईटी ) स्कॅन मशीन ठराविक ठिकाणी सुरू करणे ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फारच गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.