Breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

टीव्हीके प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

तामिळनाडूत टीव्हीकेचा दणदणीत विजय; बहुमतासाठी काँग्रेसशी बोलणी सुरू — पाच राज्यांच्या निकालांनी देश हादरला

तामिळनाडू : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले आणि देशाच्या राजकीय नकाशावर मोठी उलथापालथ झाली. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सर्वांत धक्कादायक निकाल समोर आले. या दोन्ही राज्यांत सत्ताधारी पक्षांचा दारुण पराभव झाला असून दोन्ही मुख्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघातच धुळीस मिळाले.

तामिळनाडूत विजयची ‘एन्ट्री’

तामिळनाडूत टीव्हीके पक्षाने १०८ जागांवर घवघवीत यश मिळवले. मात्र बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी टीव्हीके प्रमुख विजय यांना छोट्या-मोठ्या पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. यादृष्टीने काँग्रेसशी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी बोलणी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदार घाबरले

बंगालमध्ये ममतांचा धक्कादायक पराभव

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची तब्बल १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपाला यश आले. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच भवानीपूर बालेकिल्ल्यात तब्बल १५,१०५ मतांच्या फरकाने पराभव केला. सुवेंदू यांना ७३,९१७ तर ममतांना ५८,८१२ मते मिळाली. भाजपाने २९३ पैकी तब्बल २०६ जागा खिशात घातल्या असून तृणमूलला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. बहुमताचा आकडा १४८ असताना भाजपाचा एकहाती सत्तास्थापनेचा मार्ग आता खुला झाला आहे.

इतर राज्यांचा निकाल

आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये सत्ताधारी पक्षांनी आपला गड राखण्यात यश मिळवले, तर केरळमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button