ताज्या घडामोडीपुणे

दररोज रात्री हर्बल टी पिल्यामुळे फॅट जलद बर्न होईल.

हर्बल टी ही खास करून विविध वनस्पती, औषधी वनस्पती आणि मसाल्यांपासून बनवले जाते.

पुणे : आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेस चांगले राहण्यासाठी लोकं व्यायामासोबतच आता आहाराकडे देखील लक्ष देत आहेत. विशेषत: ज्यांच्या पोटाचे फॅट खूपच वाढले आहे, अशी लोकं जिममध्ये जाऊन तीव्र व्यायाम करतात. पण तुम्ही दररोज रात्री हर्बल टी पिऊनही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यामुळे तुमचे फॅट जलद बर्न होईल.

हर्बल टी ही खास करून विविध वनस्पती, औषधी वनस्पती आणि मसाल्यांपासून बनवले जाते. त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी आणि पचन सुधारणारे गुणधर्म शरीरातील फॅट बर्न करण्याची प्रक्रिया सक्रिय करू शकतात. रात्री हर्बल टी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो आणि झोप सुधारते, त्यातच हे टी वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, ते योग्य पद्धतीने पिणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणुन घेऊयात…

हेही वाचा –  ‘जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बहुभाषिक व्हा’; कविता भोंगाळे

ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन नावाचे घटक चयापचय वाढवतात आणि फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगवान करतात. हे हर्बल टी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

एक कप ग्रीन टी बनवा आणि त्यात लिंबू किंवा मध मिक्स करा.

तुम्ही रोज रात्री जेवणानंतर 30 -60 मिनिटांनी ग्रीन टीचे सेवन करा. याने तुमचे वजन देखील कमी होईल.

पुदिना चहा
हर्बल टी म्हणटंल की अनेकजण पुदिना चहाचे सेवन सर्वाधिक रित्या करत असतात. कारण या पुदिनाच्या चहाच्या सेवनाने शरीराची पचनसंस्था सुधारते. तसेच चयापचय वाढवते, ज्यामुळे पोटातील फॅट कमी होऊ शकते. पुदिन्याचा चहा प्यायल्याने पोटात जडपणा येत नाही.

यासाठी तुम्ही नेहमी ताजी पुदिन्याची पाने उकळून त्यात तुम्हाला हवे असल्यास मध मिक्स करू चहा बनवा

हा पुदिना चहा झोपण्यापूर्वी प्या.

कॅमोमाइलचा चहा
कॅमोमाइल चहाच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो. पुरेशी झोप शरीरातील चयापचय संतुलित ठेवते, जे वजन कमी करण्यास मदत करते. कॅमोमाइल चहाचे सेवन केल्याने शरीरातील ताण कमी होतो, ज्यामुळे पोटातील फॅट कमी होते.

कॅमोमाइल फुले एक कप पाण्यात उकळा घ्या.

झोपण्यापूर्वी 30-40 मिनिटांनी प्या.
हर्बल टी पिण्यासोबतच, तुम्हाला संतुलित आहार आणि नियमित व्यायाम देखील करणे आवश्यक आहे. नियमित आणि योग्य वेळी हर्बल टी पिल्याने चांगले परिणाम मिळू शकतात. फक्त खात्री करा की तुम्ही दिवसातून एक किंवा दोन कपपेक्षा जास्त पिऊ नका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button