Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा घाट; परराज्यातील भाजप आमदार कोल्हापुरात काढणार मोर्चा

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन पुकारले. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बैठकीतही याचे पडसाद उमटलेत. यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोगामी कोल्हापूरकर आमनेसामने आल्याचे पाहायले मिळाले.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ साकारले. गेली 62 वर्ष झाली शिवाजी विद्यापीठ या नावानेच विद्यापीठाची कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासह राज्‍यभरात ओळख आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतली आहे. विद्यापीठाचे नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे, अशी मागणी आता जोर धरू लागलीआहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने 17 मार्चला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. या मोर्चात भाजपचे तेलंगणातील आमदार टी. राजा हे देखील सामील होणार आहेत. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली.

हेही वाचा –  सोने ९० हजारांवर ! सर्वकालीन उच्चांक, असे वाढले दर

टी राजा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी सारा हिंदू मैदानात आहे. कोल्हापुरातील सर्व हिंदुंनो मी कोल्हापुरात येत आहे. 17 मार्च रोजी दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराज यांना छत्रपती या पदवीपासून कोण रोखत आहे? कोण आमच्या इतिहासावर आणि स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करत आहे? या सर्वांना आव्हान देण्यासाठी मी कोल्हापुरात येत आहे, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराला शिवप्रेमी आणि पुरोगामी कोल्हापूरकरांनी कडाडून विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. परंतु शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. या शब्दामध्येच प्रचंड ताकद आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाचे नामांतरण होवू देणार नसल्याची भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button