Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दहावीच्या परीक्षेचे हाॅल तिकीट सोमवारपासून ऑनलाइन

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हाॅल तिकीट) सोमवार, दि. २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी हाॅल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे राज्‍य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.

राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा काही दिवस लवकर परीक्षा होणार आहे. दहावी परीक्षेचे हाॅल तिकीट राज्य शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा –महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी समर्पित भावनेने काम करा : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

हाॅल तिकीटावर मुख्याध्यापक यांचा शिक्‍का उमटवणून स्‍वाक्षरी करावी. हाॅल तिकिटावर फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हाॅल तिकीट विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा त्‍याची प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत म्‍हणजे डुप्लिकेट असे नमूद करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.

हेही वाचा –भरारी पथकाकडून अचानक ‘टेस्ट’; पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय

हाॅल तिकीटामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख अश दुरुस्त्या करायच्या असल्यास त्या ऑनलाइन पद्धतीने करायच्या आहेत. त्यासाठी दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी सादर कराव्यात. विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर सुधारित हाॅल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात संपर्क साधून दुरुस्त्या कराव्यात, असेही बोर्डाकडून स्‍पष्ट करण्यात आले.

महाईन्यूज-X फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button