TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
‘पीएमपी’च्या व्यवस्थापकीय संचालकांना कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी द्या
पुणे : पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि या अधिकाऱ्याला तीन वर्षांच्या सेवेचा पूर्ण कालावधी देण्यात यावा, अशी मागणी शहरातील वाहतुकीशी संबंधित काम करणाऱ्या आणि स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करून त्यांच्या ऐवजी ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्शभूमीवर ‘परिसर’चे रणजित गाडगीळ, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर, वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे-आगाशे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.





