Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बकरी ईद निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, ‘हे’ रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग

पुणे : देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा एक महत्वाचा सण आहे. बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार मैदान परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यातील गोळीबार मैदान परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानावर होणाऱ्या नमाज पाठणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (७ जून) कोणते रस्ते बंद राहणार आणि पर्यायी मार्ग काय असणार ते जाणून घेऊयात.

भैरोबानाला ते गोळीबार मैदान

शहरातीलभैरोबानाला ते गोळीबार मैदान हा रस्ता सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात स्वारगेटकडे जाणारी जड वाहने प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने-लुल्लानगर चौकाकडे वळविली जाणार आहे. तसेच पुणे स्टेशनकडे वाहने एम्प्रेस गार्डन रस्त्याने मार्गस्थ केली जाणार आहेत.

मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान

मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान हा मार्गही उद्या सकाळी बंद राहणार आहे अशी माहिती वाहतूक पोलीसांनी दिली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी बिशप स्कूल मार्ग/कमांड हॉस्पिटल मार्ग ते नेपिअर रस्त्याने पुढे सीडीओ चौकातून इच्छित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा –  “आता संदेश नाही, थेट बातमी देऊ!” युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

सीडीओ चौक ते गोळीबार चौक

सीडीओ चौक ते गोळीबार चौक हा रस्ताही सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकातून डावीकडे वळवली जाणार आहेत, तर खटाव बंगला चौकाकडून येणारी वाहने उजवीकडे नेपिअर रस्त्याकडे वळविली जाणार आहे. तसेच सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान हा रस्ताही बंद राहणार आहे.

जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक

जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक हा रस्ता शनिवारी सकाळी बंद राहणार आहे. या रस्त्याने प्रवास करणारे लोक खाणे मारुती चौक-पुलगेट डेपो-सोलापूर बाजार चौक-नेपिअर रस्ता-खटाव बंगला चौका मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात. तसेच लुल्लानगर चौकातून गोळीबार चौकाकडे जाताना जड वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. दरम्यान वाहतूक पोलीसांनी उद्या सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button