कात्रजमध्ये विनाचालक पीएमपीचा थरार; तरुणाच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली

पुणे |महाईन्यूज|
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचा विनाचालक पीएमपी’चा थरार नागरिकांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास अनुभवला. या बसचा ब्रेक निकामी झाल्याने विनावाहक बस उतारावरुन सुमारे 100 मीटर अंतरावर गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, दोन रिक्षांचे नुकसान झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सकाळी 7.30 नच्या सुमारास कात्रज चौकत नोकरदार वर्गाची व महाविद्यालयातल विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच भाजीवाल्यांचीही मोठी लगबगीने असते. अशा या गर्दीच्या ठिकाणी कात्रज पीएमटी डेपोतून ट्रॅव्हल टाइम या कंपनीची बस (क्र. R283,MH14 CW,1744) कात्रज ते हौंसिग बोर्ड या मार्गाने जाणार होती. यासाठी ही बस स्वारगेटच्या दिशेने तोंड करुन लावण्यात आली होती. ही बस उतारावर लावण्यात आली होती. या बसचा चालक पिराजी दिवटे हा वाहकाला बोलवाण्यासाठी खाली उतरला. तोपर्यंत गाडीत कोणीही प्रवासी बसले नव्हते. मात्र नादुरुस्तीमुळे ही बस उतारावरुन खाली जाऊ लागली. तोपर्यंत कोणाचेही या बसकडे लक्ष नव्हते. तोच ही बस समोर उभ्या असलेल्या (क्र. MH12 QE7837 आणि MH12QE 7940) रिक्षांना जाऊन आदळली. यामध्ये रिक्षाचालक बाळासाहेब महारनवर आणि जावेद बेडगे हे दोघेही जखमी झाले आहेत.
पुढे जाऊन ही बस एका रिक्षावर आदळली. उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने जवळच असलेल्या दिगंबर कोराळे (रा.अय्यपा मंदीर जवळ,कात्रज) या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या जीवाची पर्वा न करता धावत्या बसमध्ये प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत पीएमपी बस मुंबई बायपास चौकापर्यंत पोहचली होती. पुढे ती सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना आदळणार; तो पर्यत या युवकाने ब्रेक दाबून गाडी थांबवली.





