Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जागेची मालकी बदलली तरी थकबाकी अनिवार्य : महावितरण प्रशासन

पुणे : जागेची मालकी बदलली, तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. त्‍या पार्श्वभूमीवर अभय योजना उपलब्ध करून देण्यात आल्‍याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

वीजबिल थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन मालक किंवा ताबेदार यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.

त्यामुळे थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेली जागा थकबाकीमुक्त करण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

हेही वाचा   –    अमित शाहांच्या वक्तव्यावर आम्ही हसतोय; संजय राऊतांचा खोचक टोला

थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७३ अकृषक ग्राहकांकडे सद्यस्थितीत ४७२ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आहे.

यातील मूळ थकबाकीपोटी ३९८ कोटी ९९ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याजाचे ६९ कोटी व विलंब आकाराचे ५ कोटी ५ लाख असे एकूण ७४ कोटी ५ लाख रुपये माफ होणार आहेत.मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळणार आहे.

मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय आहे. या योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे, असेही महावितरणकडून स्‍पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button