Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात डेंग्यूचे 136, चिकनगुनिया 23, झिकाचे 6 रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात )मागील तीन महिन्यात डेंग्यू आजाराचे 136 रुग्ण, चिकनगुनिया आजाराचे 23 रुग्ण व झिका आजाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी 4 रुग्ण गर्भवती महिला आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यू या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे की, ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे इ. त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला व वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे वैद्यकीय विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यू , चिकुनगुण्या व झिका आजारांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागामार्फत “डेंग्यू मुक्त पीसीएमसी (BEAT Dengue Campaign)” “प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास” या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध महापालिका तसेच खासगी शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये व परिसरात साफसफाई करून डास उत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली.

हेही वाचा   –    पॅरालिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! २९ पदकांवर कोरले नाव

तसेच विद्यार्थांमध्ये व नागरिकांमध्ये सोशल मिडीयाद्वारे तसेच हस्तपत्रिका वाटप करून जनजागृती करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा ताप व इतर डेंग्यू व इतर किटकजन्य आजाराची लक्षणे असल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button