ताज्या घडामोडीपुणे

चाणक्य म्हणतात हे तीन गुण जर तुमच्या पत्नीत असतील तर तुमचा संसार सुखाचा

बचत हा स्त्रीचा स्वभाविक गुण , तीन गुण जर तुमच्या पत्नीत असतील तर तुमचा संसार सुखाचा

पुणे : आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ, कुशल कुटनीती तज्ज्ञ आणि राजकीय रणनितीकार होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे. त्यांचा हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी विविध विषयांवर चर्चा केली. ज्यामध्ये आदर्श राजा कसा असावा? त्याची लक्षणं काय आहेत. प्रजेचा राजासोबत व्यवहार कसा असावा, आदर्श पती कसा असावा, आदर्श पत्नी कशी असावी, पत्नीमध्ये कोणते गुण असावेत? पतीमध्ये कोणते गुण असावेत? चांगला मुलगा कोणाला म्हणावं अशा एकना अनेक प्रश्नांची उत्तर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये दिली आहे.

आदर्श पत्नीची लक्षणं सांगताना चाणक्य यांनी पत्नीचे तीन गुण सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात हे तीन गुण जर तुमच्या पत्नीत असतील तर तुमचा संसार सुखाचा होतो. आयुष्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासत नाही. तुम्ही आयुष्यात कधीच अडचणीमध्ये येत नाहीत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा –  उन्हाळी सुट्टीला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटीच्या ७६४ अतिरिक्त फेऱ्या

आर्य चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य म्हणतात बचत हा स्त्रीचा स्वभाविक गुण असतो. जी महिला खर्चासाठी मिळणारे पैसे किंवा तिच्याकडे आलेले पैसे उधळपट्टी न करता आयुष्यात येणाऱ्या वाईट काळासाठी राखून ठेवते तिला आदर्श पत्नी म्हणावं. कारण अशा महिला हेच पैसे पतीला जेव्हा गरज असते तेव्हा देतात, त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होत नाहीत.

आर्य चाणक्य म्हणतात की पती असो अथवा पत्नी दोघांनी नेहमी एकमेकांसोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रामाणिक असाल तर तुमचा संसार सुखाचा होतो.

आर्य चाणक्य म्हणतात की महिलांनी घरात शांतता ठेवली पाहिजे. घरात आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो आदर सत्कार केला पाहिजे. त्यामुळे घरात सतत लक्ष्मी मातेची कृपा राहाते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button