Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उन्हाळी सुट्टीला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटीच्या ७६४ अतिरिक्त फेऱ्या

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून, त्याऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात. उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या मार्गावर १५ एप्रिल पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयमार्फत राज्यातील विविध मार्गावरील ७६४ जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. या जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button