पुणे विमानतळावर ब्लॅकआऊट! वीज पुरवठा खंडीत झाल्याने प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं?

पुणे : भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतातील ३२ विमानतळांवरील अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच या विमानतळांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असतानाच आता पुणे विमानतळावर शनिवारी रात्री अचानक मॅाकड्रील करण्यात आली. यावेळी जवळपास २० मिनिटे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. म्हणजेच ब्लॅकआऊट करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी रात्री ८.२५ ते ८.४५ या दरम्यान हा सराव पार पडला.
ही मॅाकड्रील असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाला सहकार्य केले. तसेच ही चाचणी यशस्वी होताच पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. उत्तर भारतातील जवळपास 32 विमानतळांवरील नागरी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दिल्ली आणि मुंबईच्या विमानतळांवरही याचे परिणाम पाहायला मिळाले. या ठिकाणी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – “है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया”; अखेर बिग बींनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सोडले मौन
या मॉकड्रीलदरम्यान विमानतळ प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली होती. विमान कंपन्या, हवाई वाहतूक नियंत्रण विभाग आणि इतर संबंधित संस्थांना याची पूर्वसूचना देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना देखील ही ड्रील कशा पद्धतीन पार पाडली जाईल, याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. अचानक करण्यात आलेल्या ब्लॅकआऊटमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाने यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर प्रवाशांनीही सहकार्य केले.