“माघार घ्यायची काही गरज नव्हती”; युद्धविरामावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारत पाकिस्तानात लष्करी कारवायांना पूर्णविराम लागला आहे. भारताने युद्धबंदीची घोषणा केली असून यासाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम यांनी मध्यस्थी केली असल्याचे बोलले जात आहे. युद्धबंदीनंतर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी माघार घ्याचची काही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया देत भारत सरकार ट्रम्प यांना मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. सिंदूर वैगेरे हे सर्व राजकारण खोटं आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
भारत सरकार ट्रम्प यांची मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे. मुळात ट्रम्प कोण? नुकसान हे भारताचं झालं आहे. ट्र्म्प यांनी इस्त्राईल आणि गाझामधील युद्ध का नाही थांबवलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर ट्रम्प यांची मध्यस्थी जगात मान्य केली जाते. तर गाझापट्टी बेचिराख केली, एक देश उद्ध्वस्त केला. पण ट्रम्प हे इस्त्राइलच्या मागे उभे राहिले. यावेळेला मोदींचे मित्र ट्रम्प हे मोदींच्या मागे उभे राहिले नाहीत, असे देखील राऊत म्हणाले.
हेही वाचा – पुणे विमानतळावर ब्लॅकआऊट! वीज पुरवठा खंडीत झाल्याने प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं?
चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला. तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही. हे महाशय या देशातून त्या देशात जगात फिरत असतात. कोणत्या देशाने पाठिंबा दिला हे जाहीर करावं. सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच दोन्ही देशांसोबत आमचे चांगले संबंध असल्याचं ते म्हणाले. जगामध्ये भारताला मित्र नाही, मोदी ५०० देश फिरून आलेत मग भारताचा मित्र कोण हे सांगाव. ठामपणे भारताच्या युद्धाला पाठिंबा देणारा देश दाखवावा, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
अमेरिकेच्या पापाने हे युद्ध का थांबवलं? हा त्यांचा पापा असेल या देशाचा पापा नाही. तुम्ही पापा घेत बसा पण देशाची बेअब्रू झाली, भावना दुखावलेल्या आहेत. २६ महिलांचे सिंदूर पुसले ते अतेरिकी कुठे आहेत. मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं. जोपर्यंत सहा अतिरेक्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर होत नाही. कुठे आहेत ते नेमके कोणी गुडघे टेकलेत असा सवाल करत राऊतांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला.