“है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया”; अखेर बिग बींनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सोडले मौन

Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सातत्याने एक ब्लॅंक ट्वीट शेअर करत होते. यावरुन त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करत भारताला पाठिंबा दिला. पण अमिताभ बच्चन यावर काहीच भाष्य केले नव्हते. अखेर 11 मे रोजी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली पोस्ट लिहिली आहे. या त्यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या काही कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत.
बिग बी लिहितात की, “सुट्टी साजरी करताना, त्या राक्षसाने निष्पाप जोडप्याला बाहेर ओढले, पतीला नग्न केले आणि त्याचे कर्तव्य पार पाडल्यानंतर, त्याच्यावर गोळीबार सुरू केला. पत्नीने गुडघे टेकून पतीला मारू नका अशी विनंती केल्यानंतरही, त्या भित्र्या राक्षसाने तिच्या पतीला अतिशय निर्दयीपणे गोळ्या घातल्या आणि पत्नीला विधवा बनवले. जेव्हा पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका. तेव्हा तो राक्षस म्हणाला, नाही, तू जाऊन सांग….’
‘मला मुलीच्या मानसिक स्थितीवर पूज्य बाबूजींच्या कवितेतील एक ओळ आठवली. जणू काही ती मुलगी ‘….’ कडे गेली आणि म्हणाली, ‘चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे’ (बाबूजींच्या ओळी) यानंतर “….” त्याने तिला सिंदूर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ जय हिंद जय हिंदची सेना….तू कधीच थांबणार नाहीस, कधीच मागे हटणार नाहीस, कधीच झुकणार नाहीस. शपथ घ्या, शपथ घ्या, शपथ घ्या अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ.
अमिताभ बच्चन यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी विशेष करून पुरुषांना धर्मावरून लक्ष्य केलं होतं. इतकंच नव्हे तर दहशतवाद्यांनी “जाऊन मोदीला सांगा, आम्ही काय केलं ते” अशी धमकी त्यांनी महिलांना दिली होती. भारताने त्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरद्वारे सडेतोड उत्तर दिल्याचं बिग बींनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.