चाकण–तळेगाव महामार्गावर भीषण अपघात
टेम्पो–रिक्षाची धडक; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

चाकण | औद्योगिक वसाहतीत बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला. वाहन ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची धडक रिक्षाला झाली. त्यामुळे रिक्षा पलटी होऊन दोन प्रवासी ठार झाले तर रिक्षा चालका सह दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाकण–तळेगाव महामार्गावर महाळुंगे गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि.१८) सकाळी भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाली. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाळुंगे पोलिसांनी दिली.
रामसुंदर राम खिलावन साखेद (वय.४७ वर्षे, सध्या रा. म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. ओडकी, जि. रिवा, मध्य प्रदेश) पिंटू राजन बिहारा (वय. २५ वर्षे, सध्या रा. महाळुंगे, मूळ रा. पट्टा सुंदरपूर, जि.पुरी, ओडिशा) असे अपघात ठार झालेल्यांची नावे आहेत, तर रिक्षा चालक रोहिदास सीताराम आडे (वय.३६ वर्षे,रा. खराबवाडी) आणि सागर मोहन मॉन्टी (वय.२६ वर्षे,रा. खराबवाडी) हे जखमी झाले आहेत.
हेही वाचा : अपप्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देऊन पक्ष प्रतिमा व पक्षाच्या परंपरेला गालबोट लावून देऊ नका..!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणकडून औद्योगिक वसाहतीच्या महाळुंगे गावच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने अपघाताची तीव्रता वाढली. अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. वाहन ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्न करीत असताना अपघात झाला अशी माहिती अपघात पाहणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
दरम्यान, चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रिक्षांना केवळ तीन प्रवाशांची परवानगी असताना दहा–पंधरा प्रवासी दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. खराब व कमी रुंदीचे रस्ते तसेच पीएमपीएल बसेस ची अपुरी संख्याही देखील अपघाताची करणे आहेत. औद्योगिक वसाहतीत रोजंदारीने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी यामुळे या मार्गांवर सातत्याने अपघात होत आहेत. खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे.
अपघातप्रकरणी पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करीत असून अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.





