Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाली आहे. महिला व बालविकास विभागाने सकाळपासून ही प्रक्रिया हाती घेतली असून, येत्या दोन दिवसांत किती महिलांना हा हप्ता मिळाला, हे स्पष्ट होईल. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या 7,74,148 महिलांना 500 रुपये मिळणार आहेत.

हेही वाचा –  जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजिक न्यायाचं नवं पर्व…”

28 जून आणि 3 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार, इतर शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना 1500 रुपये, तर 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम वितरित केली जाते. आतापर्यंत 9 हप्त्यांद्वारे 13,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून, एप्रिलच्या 1500 रुपयांसह ही रक्कम 15,000 रुपये होईल. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्याही पात्र महिलेला योजनेतून वगळले नसल्याचे स्पष्ट केले. महायुतीच्या निवडणूक विजयात या योजनेचा मोलाचा वाटा होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button