पार्थ पवार यांचा ‘काश्मीर की कली’ सोबत साखरपुडा, कोण आहेत कायनात धार?

मुंबई | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांचा लवकरच साखरपुडा संपन्न होत आहे. अभिनेत्री मॉडेल कायनात धार हिच्याशी २९ जुलै पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. पुण्यातल्या फार्महाऊसवर त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार आणि कायनात धार यांच्यातील नात्याची जोरदार चर्चा होती. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्न समारंभातही पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार दिसली होती. तसेच याआधीही पार्थ पवार आणि कायनात धार मध्य प्रदेशात महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकत्र गेले होते. तेव्हाच खरे तर त्यांच्यातील प्रेम संबंधांची चर्चा झाली होती.
गेल्या काही वर्षांपासून पार्थ आणि कायनात धार यांची मैत्री होती. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्याच्या अखेरीस त्यांचा साखरपुडा पुण्यातील फार्महाऊसवर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये सातवी जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धा उत्साहात
पार्थ पवार यांची होणारी पत्नी कायनात धार कोण आहे?
कायनात धार ही मूळची काश्मीरची आहे. कायनात धार मॉडेलिंग करीत असल्याचे सांगितले जाते. कायनातचे संपूर्ण शिक्षत दिल्लीत झाल्याचे सांगितले जाते. सध्या ती दिल्ली आणि मुंबईत राहत असल्याची माहिती आहे.
कायनातची दु:खद प्रसंगातही पार्थ पवार यांना खंबीर साथ
अजित पवार यांच्या अपघातानंतर कायनात धार हिने बारामतीत जाऊन पवार कुटुंबाला आधार दिला. तसेच मुंबईत सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजर होती. कायनात धारही पवार कुटुंबाच्या दुखा:त सहभागी झाली होती.
पवार कुटुंबात सनई चौघडे अन् लगीन घाई
गेल्या वर्षी पवार कुटुंबात दोन विवाहसोहळे संपन्न झाले. सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह पुण्याच्या ऋतुजा पाटील यांच्याशी झाला. दोघे ५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. तसेच अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाग मुंबईतील तनिष्का कुलकर्णी हिच्याशी झाला.





