गणेशोत्सवात पीएमपीएमएलच्या मार्गात बदल
पुणे : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. गणेशोत्सव काळात दि. 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये यावर उपाययोजना म्हणून वाहतुक पोलीसांकडून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बस व अन्य वाहतुकीसाठी सायंकाळी सर्व साधारणपणे 5 च्या सुमारास बंद केले जातात. अशा वेळी विद्यार्थी, कामगार व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन महामंडळाकडून स्थानक निहाय पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे
बस मार्ग क्रमांक – 2, 2अ, 2ब, 11, 11अ, 11क, 216, 298, 354 मेट्रो 13, 13, 21, 37,38,88,297,28,30,10
या मार्गाच्या बसेस गणेशोत्सव काळामध्ये शिवाजी रस्त्याने येण्यास प्रतिबंध केल्यानंतर जगंली महाराज रोड, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पुलमार्गे टिळक रोडने स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.
टिळक रोड वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गाच्या बसेस शास्त्री रोडने दांडेकर पुल येथे येऊन पुढे मित्र मंडळ चौक मार्गे लक्ष्मी नारायण चौकात येऊन नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील.मात्र जाते वेळेस स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रोडवरील वाहतुकीस प्रतिबंध होईपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
बस मार्ग क्रमांक – 3 व 6 बसमार्ग रस्ते बंदच्या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत.
हेही वाचा – राजकारणात जाणार का? गौतमी पाटीलने दिलं भन्नाट उत्तर
बस मार्ग क्रमांक – 55 मार्गाच्या बसेस रस्ता बंद काळात शनिपार/मंडई ऐवजी नटराज स्थानकावरून सोडण्यात येतील. तसेच सदरच्या बसेस जाता-येता नेहमीच्या मार्गाने म्हणजेच अंबिल ओढा कॉलनी, सेनादत्त पोलीस चौकी मार्गे सुरू राहतील.
बस मार्ग क्रमांक – 58 व 59 या बसमार्गाच्या बसेस रस्ता बंद काळात डेक्कन जिमखाना स्थानकावरून सोडण्यात येतील.
बस मार्ग क्रमांक – 8,81,94,108,143,144, 144क, 144अ, 283 मार्गाच्या बसेस कोथरूडहून पुणे स्टेशनकडे जातांना मार्गामध्ये कोणताही बदल होणार नाही.परंतु पुणे स्टेशन कडून येताना या मार्गांच्या बसेस ससून हॉस्पिटल, मालधक्का, जुना बाजार, म.न.पा. भवन बस स्थानक, काँगेस भवन, बालगंधर्व, डेक्कन बस स्थानक, खंडुजी बाबा चौक येथून पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.सदरचा बदल वाहतुक पोलीसांनी (Pune) लक्ष्मी रोड वाहतुकीस बंद केल्यानंतरच करावयाचा आहे.
बस मार्ग क्रमांक – 9 व 173, 174 या मार्गाच्या बसेस कोंढवा गेट येथुन पुणे स्टेशनकडे येताना केळकर रोडने अ.ब.चौक येथे येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने लाल महाल येथे येऊन पुढे देवजी बाबा मंदिर चौक येथुन उजव्या हाताला वळण घेऊन गुरूद्वारा रस्ता मार्गे हमजे खान चौक येथे येऊन डाव्या हाताला वळण घेऊन पुढे नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील.
मार्ग क्र. 174 पुणे स्टेशन कडून एनडीए कोंढवा गेट कडे जाताना जर लक्ष्मी रोड वाहतुकीकरीता बंद केल्यास सदर मार्गाच्या बसेस नेहमीच्या मार्गाने मॉडर्न बेकरी चौक येथे येऊन डाव्या बाजूस वळण घेऊन सेव्हन लव्हज चौकातुन उजव्या हातास वळण घेऊन स्वारगेट चौकात येतील. स्वारगेट चौकातून सरळ नेहरू स्टेडीयमवरून सारसबाग टिळक रोडमार्गे डेक्कन कॉर्नर येथे जातील व तेथुन पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
बस मार्ग क्रमांक- 7,197,202 या मार्गांवरील बसेस रस्ता बंद काळात जाता-येता म्हात्रेपूल मार्गे स्वारगेट शंकरशेठ रोडने सेव्हन लव्हज चौकातून डावीकडे वळुन रामोशीगेट, भवानीमाता मंदिर, म.गांधी स्थानकापुढे नेहमीच्या मार्गाने जातील. मात्र भवानीमाता मंदिराजवळ रस्ता बंद झाल्यानंतर गोळीबार मैदान, म.गांधी स्थानकापुढे जाता-येता नेहमीच्या मार्गाने सुरू राहतील.
बस मार्ग क्रमांक – 13,42,299 या मार्गांवरील बसेस शास्त्री रोड बंद झाल्यावर दांडेकर पूल नंतर सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रेपूल वरून पुढे कर्वेरोडने डेक्कन व पुढे नेहमीच्या मार्गाने जाता-येता चालू राहतील.
बस मार्ग क्रमांक – 5,24,24 अ, 235,236 या बसमार्गांवरील बसेस जाता-येता नेहमी प्रमाणे संचलनात राहतील.
बस मार्ग क्रमांक – 180,181 वाहतूक पोलीसांनी नेहमीचा रस्ता बंद केल्यानंतर या मार्गांवरील बसेस मंगला टॉकिजनंतर, सुर्या हॉस्पिटल, कुभांरवाडा, जुना बाजार, बोल्हाई चौक, लाल देऊळ, वेस्टएन्ड, जुना पुलगेट, म.गांधी स्टॅन्ड व पुढे नेहमीच्या मार्गाने जाता-येता संचलनात राहतील.
बस मार्ग क्रमांक- 4,26,68,71,339,232,103,89,90,64,72,78,199
गणेशोत्सव कालावधीमध्ये टिळकरोड वाहतूकीकरिता बंद झाल्यानंतर सदरचे मार्ग शास्त्रीरोड, दांडेकर पूल मार्गे संचलनात राहतील.
बस मार्ग क्रमांक – 113, 113अ गणेशोत्सव कालावधीमध्ये सदरचे मार्ग दोन्ही पाळीमध्ये मनपा पंप स्थानकावरून संचलनात राहतील.
बस मार्ग क्रमांक – 17,50 गणेशोत्सव कालावधीमध्ये शिवाजी रोड वाहतूकीकरिता बंद झाल्यानंतर सदरचे मार्ग स्वारगेट/नटराज स्थानकावरून संचलनात राहतील.
गणेशोत्सव काळात सायंकाळी 5 वाजताचे सुमारास शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर बसमार्गांमध्ये वरीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. तथापि ऐनवेळी वाहतुक पोलीस विभागाकडून वाहतुकीमध्ये बदल केल्यास त्याप्रमाणे बस संचलन सुरू राहील.