Breaking-newsमहाराष्ट्र

अकोला : खामगावमध्ये दोन गटांत हाणामारी

अकोला : खामगावमधील शिवाजीनगर येथे जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी, दगडफेक व जाळपोळ झाल्याची घटना सोमवारी रात्री १०.४०च्या सुमारास घडली. या घटनेत चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

सदर घटनेत दोन दुचाकी, एक हातगाडी आणि एका दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या एका नगरसेवकासह सुमारे ३१ जणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. कबड्डी स्पर्धेच्या वादातून दोन गटांमध्ये फेब्रुवारीमध्ये वाद झाला होता. सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पुन्हा हा वाद उफाळून आला. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली, तसेच जाळपोळ सुरू केली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. पोलिसांनी काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button