राज्यात सामाजिक अराजकता पसरवणाऱ्या नितेश राणेंना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करा; इम्रान शेख
नितेश राणेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक आंदोलन
पिंपरी | आमदार नितेश राणे यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित करण्यात येत असल्याचे आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथे आक्रमक आंदोलन घेण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले.
यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “गेल्या काही दिवसा पासून नितेश राणे मुस्लिम समाजाविरुद्ध गरळ ओकून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक भाषणात संविधानाचे संकेत पायदळी तुड़वत हिंदू-मुस्लिम दंगल व्हावी यासाठी आटापिटा करत आहे. काल परवा नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून मशिदीत घुसुन एकेकाला मारण्याची म्हणजेच मुस्लिम समाजाच्या नरसंहाराची धमकी दिली.दीड-दमडीची सामाजिक ऐपत नसलेल्या या कोंबडी चोराने पोलीस बांधवाबद्दलदेखील घाणेरडे शब्द उच्चारले.फक्त गृह विभागाच्या ढिलेपणामुळे याचे धाडस वाढत आहे.योग्य वेळी याला कायद्याचा बड़गा दाखवला नसल्यामुळेच तो दररोज कायद्याला आव्हान देत सुटला आहे. मागील काही वर्षापासून भाजप पक्ष आणि त्यांचा नेत्या कडून धार्मिक द्वेषाचे वातावरण तयार करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असून दुर्दैवाने त्याला देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय पाठबळ मिळत असल्याने अश्या वाईट प्रुवृत्तीस बळ मिळत आहे. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी अशोभनीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की,आपल्या राज्याची नकारात्मक प्रतिमा उभी करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कड़क कार्रवाई करण्यात यावी.तसेच देशद्रोहाच्या गुन्ह्या मधे त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा – क्रिकेटर रवींद्र जडेजाचा राजकारणात प्रवेश, पत्नी रिवाबाने दिली माहिती
महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या “राज्यातील महागाई, बेरोजगारी,महिलांवरील वाढते अत्याचार,भ्रष्टाचार आणि सरकारचं निकृष्टपणा लपवण्यासाठी हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद पेटवण्याचे काम नितेश राणे करत असून महाराष्ट्रातील जनता येणारे निवडणुकीत नितेश राणे आणि भाजपला त्यांची योग्य जागा दाखवतील.”
शहर कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे म्हणाले, राणेंनी मुस्लिम विरोधात न बोलता,हिंदूच्या मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी युती सरकारला धारेवर धरावे.हिंदू मुलीवर अत्याचार होत आहेत त्यासाठी सरकारला जाब विचारावा हा देश राणेंच्या बापाचा नाही,सर्व जाती धर्माचा आहे.आम्ही सर्व भारतीय आहोत नितेश राणेनी मुस्लिम धर्मा विरोधात जी गरळ ओकली त्यामुळे मुस्लिम बांधव भगिनी च्य भावना दुखावल्या आहेत.महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांनी राणे वर सुमोटो गुन्हा दाखल करून कारवाई करावी.”
यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख, शहर कार्यअध्यक्ष देवेंद्र तायडे, मौलना अब्दुल गफ्फार, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर,
कार्याध्यक्ष सागर तापकीर मा नगरसेविका प्रियांका बारसे, मा उपमहापौर विश्रांती पाडळे, संदीप चव्हाण,सचिन गायकवाड, अन्वर भाई पानसरे, साकी गायकवाड, मेघराज लोखंडे, रजनीकांत गायकवाड, शाहिद शेख, मयूर खरात, रेखा मोरे, आश्रफ शेख, हबीब शेख, तायरा सय्यद, कल्पना गाडगे, कविता कोंडे,कमरुनिसा शेख, काँग्रेसचे शाबुद्दीन शेख, अल्पसंखाक विभागाचे अल्ताफ शेख, हाफिज मोईन, विवेक विधाते, विकास कांबळे, किरण डावकर, शाकीब शेख, अरबाज शेख, अनिकेत गायकवाड, विजय वाघमारे, सिद्धांत कसबे, जमीर सय्यद, अवधूत कदम अभिषेक साबळे, परवेज शेख, सार्थक बाराते, अभिजीत कोळेकर ,राहील शेख, राजेश हरगुडे, प्रशांत कालेल, साहिल वाघमारे, हनीफ शेख, नियमत शेख, फहिम शेख, साहिल वाघमारे, दिनेश पवार, पुष्पा जानराव, राजश्री करंडे तसेच मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थिस्त होते.