ताम्हिणी घाटात बस दरीत कोसळून 5 जण ठार ; २७ जण गंभीर जखमी

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटाजवळ एका धोकादायक वळणावर बसला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आलीय. बस दरीत कोसळून पाच जण जागीच ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत. बस चाकण इथून महाडला लग्नासाठी जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये 40 च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती.
हेही वाचा – विराट-अनुष्का भारत सोडणार? ‘या’ देशात शिफ्ट होणार; कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा
मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आलं.
रायगडच्या ताम्हिणी घाटात एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते. पुण्यावरून रायगडच्या दिशेकडे येत असताना ताम्हिणी घाटातील तीव्र वळणावर ही बस कलंडली आणि अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण 45 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. त्यामधील बरेचसे प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळतेय. काही प्रवासी बसखाली अडकून पडल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.





