Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रिय

पाकीस्तानी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी !

नवी दिल्ली :  सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना कोणताही पाकिस्तानी कंटेंट, गाणी, पॉडकास्ट दाखवू नयेत असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून हा मोठा निर्णय घेतला आहे.

यामुळे पाकिस्तानी कंटेंटवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतातील प्रेक्षकांना पाकिस्तानी गाणी आणि वेब सिरीज पाहता येणार नाहीत.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान तुटला आहे. आता भारताने शेजारच्या देशातील मनोरंजन उद्योगालाही उध्वस्त केले आहे. केंद्राने सर्व प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी कंटेंट देखील स्वच्छ करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा –  आपण सर्व एकच आहोत; अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचे प्रतिपादन

त्यामुळे ना पाकिस्तानची गाणी वाजवली जाणार आहेत, ना वेब सिरीज आणि पाकिस्तानी नाटके पाहता येणार आहेत. हे पाऊल उचलत भारत सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना कडक सूचनाही दिल्या आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनेल आणि सेलिब्रिटींवर बंदी घातली. आता एक पाऊल पुढे टाकत पाकिस्तानी कंटेंटवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर पाकिस्तानी उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे. हे नियम तात्काळ लागू होतील अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button