Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘रोथे एर्डे इंडिया कंपनीतील कामगारांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करा’; मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : रोथे एर्डे इंडिया प्रा. लि., वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राधान्य देऊन तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली नरिमन भवन येथे बैठक पार पडली. कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगार कायदे, किमान वेतन, कामाचे तास तसेच इतर नियमांचे कंपनीतर्फे पालन होत आहे किंवा नाही, याची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल प्राधान्याने सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थितीच्या आधारे कामगारांना न्याय देण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल.

बैठकीत कामगार प्रतिनिधींनी काही कंत्राटी कामगारांच्या बदलीबाबत तसेच वेतन आणि इतर सेवाशर्तींसंदर्भातील मुद्दे उपस्थित केले. यावर चर्चा करताना मंत्री ॲड फुंडकर यांनी कामगार आणि कंपनी व्यवस्थापन या दोन्ही पक्षांशी स्वतंत्रपणे तसेच संयुक्तरित्या चर्चा करून सामंजस्याने उपाय योजना करण्याविषयी सूचना दिल्या.

हेही वाचा –  म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांच्याकडून मुंबई विमानतळाची पाहणी

कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, त्यांच्या मागण्या कायदेशीर व वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून पूर्ण कराव्यात. सर्व संबंधित पक्षांना न्याय मिळेल, यासाठी कामगार विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही मंत्री ॲड. फुंडकर यांनी नमूद केले.

बैठकीस आमदार हिरामण खोसकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मड, तसेच संबंधित अधिकारी, कामगार संघटनाचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button