Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘हातगाडी,स्टॉलवरील कारवाईला विरोध, फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी’; काशिनाथ नखाते

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांनी  फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न करता नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत  अशा सर्वच विक्रेत्यावरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे. रस्ता शुशोभीकरण आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली असे गोरगरिबांना चिरडून टाकणं  आणि  त्यांचे साहित्ये जप्त करणे अत्यंत चुकीचे असून महानगरपालिकेने फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा  पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला.

चिंचवड स्टेशन मोहननगर येथे विक्रेत्यांनी एकत्र येऊन  कारवाईस विरोध केला. यावेळी महासंघाचे निमंत्रक सलीम हवालदार, मनसेचे नितीन चव्हाण, संभाजी वाघमारे ,दिनेश नामदे, प्रकाश मोरे,संतोष कोळी, अनिल गिरी, विनायक थंबी आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  इंद्रायणी प्रदूषित करणाऱ्यांवर होणार कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सर्वच प्रभागांमध्ये सचोटीने व्यवसाय करून जगणाऱ्या पथारी, हातगाडी, स्टॉलधारकावरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. एकीकडे हॉकर झोनची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्र शासन, केंद्र शासन त्याचबरोबर न्यायालयीन लढाई ही लढत आहोत मात्र महानगरपालिकेचे  आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे जाणीवपूर्वक या कायद्याला बगल देऊन परस्पररित्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कारवाई करण्यासाठी आदेश देत आहेत हे चुकीचे असून अशा कारवाईस विरोध राहील, असे नखाते यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button