Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सणासुदीत तरी पाणी द्या; पुणेकरांचा महापौरांना प्रश्न

पुणे : पुणेकरांना सलग पाच तास पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची योजना सोमवारपासून अमलात येणार असतानाच पाण्याअभावी हैराण झालेल्या नागरिकांनी थेट महापौर बंगला गाठून रविवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. “सणासुदीत तरी पाणी द्या’, अशी मागणी करीत महिलांनी पाणी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे महापौर बंगल्यात गोंधळ निर्माण झाला.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली असून, काही भागांत अपुरे आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाण्याच्या मुद्यावरून त्या-त्या भागांतील रहिवासी रस्त्यावर उतरत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button