Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विभागात 33 हजार 273 क्विंटल अन्नधान्याची; तर 8 हजार 109 क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 33 हजार 273 क्विंटल अन्नधान्याची तर  8 हजार 109  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 397 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 18 हजार 869  क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 10 मे 2020 रोजी  99.085   लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.133    लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 19  हजार 682  स्थलांतरित मजुरांची सोय

90 हजार 668 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 136 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 18 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 222 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.    या कॅम्पमध्ये 19  हजार 682 स्थलांतरित मजूर असून 90 हजार  668 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button