Breaking-newsपुणे

पुण्याहून मुंबईला गेलेल्या माजी मिस इंडियाला कोरोनाची लागण

प्रसिद्ध मॉडेल, माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नताशा सुरी हिला कोरोनाची लागण झाली आहे. नताशानं स्वत: याबाबत माहिती दिली आहे. नताशा सध्या होम क्वारंटाइन आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. मी काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या कामानिमित्त पुण्याला गेले होते. तिथून आल्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागल्याने मी टेस्ट केली असता माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे ती म्हणाली.

कोरोनाची लागण झाल्यामुळे नताशाला आपल्या आगामी ‘डेजेंरस’ या चित्रपटाचे प्रमोशन करता येणार नाही. या चित्रपटात बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोवर यांच्यासोबत नताशा मुख्य भूमिकेत आहे.

नताशाच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत आहे. ताप आणि अशक्तपणा जाणवत आहे. पण वेळेवर गोळ्या आणि इम्युनिटी बूस्टर घेत आहे. सध्या आजी आणि बहिणीसोबत राहत आहे. त्यामुळे त्यांचीही कोरोना चाचणी करणार असल्याचे नताशानं सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button