Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#COVID-19: भडकंबे गावातील ‘या’ रुग्णाचे ग्रामस्थांनी केले स्वागत

– गावातील पहिला रुग्ण राजेंद्र पाटील यांची कोरोनावर मात
सांगली। प्रतिनिधी
सांगली जिल्हातील वाळवा तालुक्यातील भडकंबे गावामध्ये पहिला कोरोना पोजिटिव्ह रुग्ण सापडला होता. शिवाजीनगरचे माजी अध्यक्ष राजेंद्र शंकर पाटील हे गेल्या महिन्यापासून कोरोनाशी झुंज देत होते त्यांनी ह्या कोरोनाचा झुंज देऊन पराभव करून आज ते घरी परतले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिवाजीनगर मधील सर्व तरुण वर्ग व महिला उपस्थित राहून त्यांचे स्वागत करण्यात आले.
ग्रामपंचायत भडकंबे चे माजी उपसरपंच अशोक पाटील यांनीही स्वागत केले. तसेच उत्तम कुलकर्णी, बजरंग पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, बाळू स्वामी , सचिन पाटील, अमोल पाटील, प्रवीण पाटील, विनायक पाटील व एकता युवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहून पाटील यांचे स्वागत केले आहे.






