Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
तमाशा वाईट नाही त्याला बदनाम करू नका – रघूवीर खेडकर

पुणे – तमाशाने कोणी बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधरत नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलं आहे. निवृत्ती महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, तमाशाकडे गेलेला माणूस त्यांनी कीर्तनाकडे आणला, असं त्यांच्या समर्थकांनी म्हटलं होतं. यावर खेडकरांनी आपली बाजू मांडत इंदोरीकारांच्या समर्थकांना चपराक लगावली आहे.
तमाशा वाईट नाही त्याला बदनाम करू नका. तमाशाला साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे. या कलेकडे लोक चुकीच्या अर्थाने पाहतात. ग्रामीण भागातील लोकांना तमाशा आवडतो, त्यांनीच या कलेला बळ दिलं असल्याचं खेडकर यांनी सांगितलं आहे.
तमाशाला तुच्छ लेखणं चुकीचं आहे. तमाशाच्या वगनाट्यातून लोकांच्या हिताचे विचार देण्याचं काम आम्ही तमाशा कलावंत करत आहेत. तमाशा दु:ख विसरायला लावतो आणि कीर्तनात भक्ती शिकवली जाते, असं खेडकर यांनी म्हटलं आहे.





