Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई, उपनगरात येत्या दोन-तीन तासांत विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मुंबई – मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यातच आगामी दोन ते तीन तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भात माहिती दिली.

मुंबईत रविवारी मध्यरात्रीनंतर चांगला पाऊस पडला होता. मात्र सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु येत्या काही तासांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मान्सूनचा पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुण्यातही रविवारी मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले असून आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button