Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

करोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे । प्रतिनिधी

महापालिकेच्या दळवी रुग्णालयात करोना रुग्णांची भरती बुधवारपासून बंद करण्यात येणार आहे, अन्य आजाराच्या रुग्णांसाठी आता या रुग्णालयाचा वापर करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती; मात्र, आता ती कमी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता काही रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी सुरुवातीला दळवी रुग्णालयात दाखल करून घेणे बंद केले आहे. याशिवाय काही रुग्णालयांशी करारही संपुष्टात आणण्याचा विचार केल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

दळवी रुग्णालयातील रुग्ण बाणेर येथील रुग्णालय आणि शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात हलवण्यात येणार आहेत. याठिकाणी आता अन्य आजारांवर उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button